राज्यात मराठा, ओबीसी, धनगर व मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच धनगर आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. लवकरच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करा