Advertisement

गेवराईत तब्बल १८ तलवारी जप्त

प्रजापत्र | Sunday, 15/09/2024
बातमी शेअर करा

गेवराई दि.१५ (प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्याच्या कायदा आणि सुवस्थेत मोठे बदल होत असल्याचे चित्र असताना शनिवारी (दि.१४) रात्री ११ च्या सुमारास गेवराईत पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत.गेवराई पोलिसांनी यावेळी एका आरोपीला ही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 
        भगवान फकिरा पवार (वय-४० रा.हिरापूर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.भगवान शनिवारी रात्री दुचाकीवरून १८ तलवारी कोणताही परवाना नसताना घेऊन फिरत होता.प्रवीणकुमार बांगर यांना याबाबत माहिती कळल्यानंतर त्यांनी त्रिमूर्ती हॉटेल पाडळशिंगीजवळ त्यास ताब्यात घेतले.यावेळी ३६ हजारांच्या १८ तलवारी पोलिसांना आढळून आल्या असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.   

 

Advertisement

Advertisement