बीड दि.१५ (प्रतिनिधी)-मागच्या सात महिन्यांपासून एमपीडीएमधील फरार असलेल्या आरोपीच्या पाथर्डी तालुक्यातील मढीमधून शिवाजी नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निखिल गणेश रांजवण (वय-२०) असे त्या आरोपीचे नाव असून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
निखिल रांजवण बीडमधील हिंसाचाराच्या गुन्हयात आरोपी होता.जाळपोळ प्रकरणात त्याच्यावर बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याशिवाय मारामारीसह इतर काही गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.मागच्या सात महिन्यांपासून तो फरार असताना पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना निखिलबाबतची माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी संजय वडमारे,रवींद्र आघाव,लिंबाजी महानोर या पोलीस कर्मचाऱ्यांना पाथर्डी तालुक्यातील मढी येथे तो सापडला.पोलिसांनी त्याच्या तेथून मुसक्या आवळून हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

बातमी शेअर करा