Advertisement

आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, उद्या जाहिरात निघणार

प्रजापत्र | Sunday, 17/01/2021
बातमी शेअर करा
राज्यातील आरोग्य विभागासंबंधी एक मोठी बातमी हाती आली आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचंही ते म्हणाले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल, असं ते म्हणाले. 
टोपे म्हणाले की, मी आरोग्य सचिवांना सोमवारपर्यंत जाहिरात देण्याबाबत सांगितलं आहे. जीएनएम, नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील. क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल, असं ते म्हणाले.
जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
 
टोपे म्हणाले की, आधी एसईबीसी ग्रहित धरुन आपण अर्ज मागवले होते. आता एसईबीसी रद्द झाल्यानं ते ओपनमध्ये गेले. मग पुन्हा त्याचं रोस्टर बनवण्याची आवश्यकता होती. पूर्ण मागासवर्गीय कक्षांमध्ये याबाबत पूर्ण होमवर्क करावा लागला. प्रत्येक संवर्गाचा आम्ही रोस्टर फिक्स केले आणि आता परीक्षा आता आम्ही व्यवस्थित घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement