बीड-पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईचे सक्त आदेश दिल्यामुळे जिल्ह्याभरात अवैध धंदे व नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.याच बरोबर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यावरही सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या सुरु असलेल्या कारवायांचा वेग आता आणखीनच वाढला आहे.शनिवारी रात्रीतून आठ ठिकाणी छापे मारून ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल वेगवेगळ्या कारवायांतून जप्त करण्यात आला.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया झाल्या आहेत.
शनिवारी (दि.१४) रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंजेरी फाटा मटका बुक्कीवर धाड,खामगावमध्ये जुगाऱ्यांवर छापा,तिप्पटवाडीच्या इंद्रायणी धाबा,खापरपांगरीतील सुखसागर हॉटेल,सोनेगाव शिवारातील निवांत हॉटेल,म्हसोबा फाट्यावरील रानवारा हॉटेल,महालक्ष्मी चौकातून पोलिसांनी देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.याशिवाय पारगावमधील एका पान शॉपवरून पेट्रोलच्या ३० बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.दरम्यान रात्रभर सुरु असलेल्या या कारवाईतून जवळपास ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे कळते.
बातमी शेअर करा