Advertisement

सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव; राज्य सरकारचा निर्णय

प्रजापत्र | Friday, 13/09/2024
बातमी शेअर करा

   सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे.

 

 

१ मे २०२४ रोजी जन्मलेल्या व्यक्तींसाठी
महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाची म्हणजे सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे. जर १ मे २०२४ रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर त्यावर त्या व्यक्तीच्या आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नाही आहे. जर संबधित व्यक्तीची इच्छा असेल तरच वडिलांचे नाव लावू शकते.

 

 

सातबाऱ्यात फेरफार केल्यास काय करावे?
जर आहे त्या सातबारा उताऱ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर, त्यावर आईचे नाव लावले जाणार आहे. जर एखादी महिला विवाहित असेत तर तिला पती किंवा वडिल यापैकी कोणाचेही नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

 

२४ भाषांमध्ये सातबारा
जमिनीबाबत माहिती देणारा सातबारा मराठीसह २४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारने सातबारा मराठीसह २४ भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. आणि या निर्णयाची अंमलबजाबणी प्रथम महाराष्ट्रात झाली.

Advertisement

Advertisement