शितल वाघमारे
धाराशिव दि. ११ - मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यासाठी राजकारणाचा नवा मुद्दा ठरलेल्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्ग कामाचा श्रीगणेशा गणेश चतुर्थी दिवशी झाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कामाची सुरुवात केली असल्याच प्रेसनोट काढून सांगितलं.यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे रेल्वे मार्गाच्या रुळावरून महायुती बळकट होणार का नाही हे विधानसभेच्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
महाराष्ट्र राज्यात आणि उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विधानसभा मतदारसंघ निहाय मताधिक्यामुळे महाविकास आघाडीची गाडी सुसाट आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वाच्या अनेक प्रकल्पापैकी धाराशिव सोलापूर रेल्वे हा एक आहे. या रेल्वे मार्गाच्या भुसंपदनावरून सत्ताधारी आणि विरोधक आरोप - प्रत्यारोप झाले. रेल्वे मार्गाचे काम सुरू झाल्याने जिल्ह्यातील महायुती रेल्वेच्या रुळावरून बळकट होणार असल्याची आशा महायुतीच्या नेत्यांना दिसते परंतु लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी उघडउघड आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ही धुसफूस कुठल्या टोकापर्यंत जाणार हे येणारा काळच ठरवेल
धाराशिव-कळंब आणि तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील जमीन रेल्वे मार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे या
रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 225 कोटींची तरतूद करण्यात आली आहे याचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे मानले जात असले तरी खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत
महायुती सरकारच्या काळात जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, ही विरोधकांची ओरड होती. मात्र सत्ताधारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पातील रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीचा मुद्दा वेचून विरोधकांपुढे ठेवला आहे. आमदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव ते सोलापूर रेल्वे महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत