Advertisement

बीडका आमदार कैसा हो ? धनंजय मुंडेंनाही प्रश्नच

प्रजापत्र | Thursday, 12/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि. ११ (प्रतिनिधी ) : अजित पवारांची राष्ट्रवादी खरोखर महायुतीत लढणार का ? लढली तर किती जागा वाट्याला येणार का स्वतंत्र लढावे लागणार याची कोणतीच माहिती सध्या तरी कोणालाच नाही. पण बीड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. यातून प्रत्येक गट वेगळा कार्यक्रम घेण्याच्या नादात आहे, आणि प्रत्येक कार्यक्रमात 'बीड का आमदार कैसा हो ' म्हणून वेगळ्याच नेत्याच्या नावाचा जयजयकार होती . त्यामुळे आता बीड का आमदार कैसा हो ? हा प्रश्न खुद्द धनंजय मुंडेंनाही पडला आहे.

धनंजय मुंडे हे पर्वा एका कार्यक्रमासाठी बीडला आले होते. कार्यक्रम होता अल्पसंख्यांक मेळाव्याचा . बाबा सिद्दकी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे नियोजन अगओड्र पक्षाने डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे दिले होते म्हणतात , मात्र नंतर बीडच्या राष्ट्रवादीमधील दुसऱ्या एका गटाने हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात धनंजय मुंडे जात असताना साहजिकच घोषणाबाजी झाली , त्यात 'बीड का आमदार कैसा हो ? फारूक पटेल जैसा हो' असे चित्र रंगविले गेले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बीडमध्येच 'बीड का आमदार कैसा हो ? 'ला 'योगेश 'भैय्या जैसा हो 'असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले होते. याचाच धागा पकडून धनंजय मुंडे यांनी कालच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात 'बीडचा आमदार व्हायचंय तरी कोणाकोणाला ? असा सवाल केला. जो कार्यक्रम घेतो , त्याचे कार्यकर्ते तशा घोषणा देतात . योगेश क्षीरसागरांचे झाले , फारूक पटेल यांचेही झाले. शेख तय्यब फिरत आहेतच, अजून अमर नाईकवाडेंनी कोणता जाहीर कार्यक्रम घेतलेला नाही, त्यामुळे त्यांचे काय ते माहित नाही असे सांगतानाच ' आज अमरसिंह पंडित येणार होते, पण ते आजारी असल्याने आले नाहीत ' हे सांगायला धनंजय मुंडे विसरले नाहीत. आणि त्यामुळेच 'बीड का आमदार ' चे उत्तर आज तरी धनंजय मुंडेंकडेही नसल्याचे चित्र  राष्ट्रवादीमध्ये आहे.

Advertisement

Advertisement