Advertisement

अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार?

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

पुणे - राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे दोन गट पडले आहेत, आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने दिसणार आहेत, निवडणुकीत बारामती विधानसभेत शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, या चर्चा सुरू आहेत. यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

 

 

"बारामती विधानसभेची जागा  कुणाला मिळणार हे अजूनही नक्की नाही. याची मला माहिती नाही, अशी माहिती आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे.या बैठकीत जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवले, असंही सुळे म्हणाल्या. 

Advertisement

Advertisement