भंडारा : गद्दार आमदाराला धडा शिकवा आणि पुन्हा एकदा २०१९ ला जो इतिहास घडवला तोच इतिहास पुन्हा घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भंडारा येथील शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले कि नव्याने इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेले आहोत. राज्यात विकासकामे होत नाही म्हणून लोकं त्रस्त झाले आहेत. पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत. त्यामुळं लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचे दार काढून बाजूला ठेवलं. जाहिराती करून सरकारला समाधान नाही. त्यामुळं सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी घराघरात जाहिरात केली जात आहे.
सगळ्यांनी एकमताने काम केलं पाहिजे, आता एवढी जण आहेत, चार पाच जण मिळून सरकार चालवत आहेत. तरी त्यांना यश येत नसल्याची टीकाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्यात लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही-जयंत पाटील
आगामी विधानसभेसाठी उमेवादर निवडनं अवघड आहे. म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहे, हे बघण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रा ऐन गणपतीचा महोत्सव चालू असताना आम्ही सगळे आपल्या दारात घेऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. आनंददायी बाब म्हणजे जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेल्या आहेत. महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे.लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कोणी करणार नाही, याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. त्यामुळे आज लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही. ही समाजात पसरलेली भावना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असेही जयंत पाटील म्हणाले.
आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, जिल्हा रुग्णालयात जातो ती उत्तम सेवा तिथे तुम्हाला मिळाली पाहिजेत. तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे. मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या प्रकल्पाला गती देण्याचं काम केलं, फॉरेस्टचे काही प्रश्न होते पण या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.