भिमराव कांबळे
अहमदपूर दि.७ (प्रतिनिधी): प्रतिवर्षाप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचा वाढदिवस हा प्रतिवर्षी तिथीप्रमाणे गणेश चतुर्थी दिनी साजरा केला जातो. आज अहमदपूर शहरातील विराज गार्डन व फंक्शन हॉलमध्ये गणेश हाके यांचा वाढदिवस त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मागील २५ वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेते प्रदेश प्रवक्ते असा प्रवास करताना त्यांनी कमावलेले कार्यकर्ते व समर्थक मोठया संख्येने दिसून येतात. अहमदपूर चाकूर तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते हे बहुसंख्य आहेत प्रतिवर्षा पेक्षा यंदाचा हा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला असून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातून ते भावी आमदार यांच्या यादीमध्ये चर्चेत आहेत आज अहमदपूर चाकूर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून सदिच्छा दिल्या प्रत्येक जण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचा निश्चय करून आल्याने या फंक्शन हॉलमध्ये मोठी गर्दी पाहण्यास मिळाली ही सर्व समर्थकांची गर्दी पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत गणेश हाके हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असून एकीकडे माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट असताना गणेश हाके आणि माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे भाजपचे दोन चेहरे येत्या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर येणार का? किंवा या दोघांपैकी एक चेहरा कोणता असणार असा प्रश्न येथील भाजप मतदारांना पडल्यामुळे येथील भाजपाचे मतदार मात्र संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे भाजपा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधत असताना अहमदपूर चाकूर विधानसभेत भाजप महायुती एकत्र निवडणूक नसल्याचे या आधीच स्पष्ट झाले आहे. भाजपा आपला एक उमेदवार देणार असल्याची ग्वाही जरी येथील भाजपा पदाधिकारी देत असले तरी इच्छुकांच्या यादीत मात्र माजी आमदार बब्रुवान खंदाडे व गणेश हाके ही दोन नावे भाजपा मतदारांची चिंता वाढवीत आहेत.
गणेश हाके यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लागलेली बॅनर्स, होर्डिग्स व वाढदिवसानिमित्त जमलेला जनसमुदाय हे सर्व आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेश हाके यांनी शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा मतदार संघातून होत आहे.

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा