Advertisement

दारू पिऊन गाडी चालवतो का ? म्हणत महेश मांजरेकरांनी केली मारहाण......! पोलिसात गुन्हा दाखल....!

प्रजापत्र | Sunday, 17/01/2021
बातमी शेअर करा

 

डी. डी. बनसोडे/केज

दौंड दि.१७ -  अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला काल पाठीमागून धक्का दिला. मांजरेकर यांच्या गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांचा  संबंधित व्यक्तिसोबत वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. मांजरेकरांच्या गाडीला मारूती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली. याबाबत तक्रारदार व्यक्तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कैलास सातपुते असं तक्रारदाराचं नाव आहे.

           महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठी मागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी ‘तू दारू पिउन गाडी चालवतोस का’ असं म्हणत आपल्याला चापट मारली, असं कैलास सातपुतेंनी म्हटलं आहे.

              दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या यवत पोलिसांकडे दिली आहे. मांजरेकरांवर यवत पोलीस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement