Advertisement

जखमा ज्या जिव्हारी लागल्या

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि. ९ (प्रतिनिधी ) : राजकारण म्हटलं की जय पराजय आलाच . विजयाचा उन्माद येऊ द्यायचा नाही आणि पराभवाने घायाळ व्हायचं नाही असं म्हणतात. मात्र पराभवाच्या काही जखमा खोलवर आघात करतात आणि त्या लवकर भरून येत नाहीत. सध्या तसाच काहीस राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं झालंय. बहीण पंकजा मुंडेंच्या  लोकसभा निवडणुकीतील पराभवाची झालेली जखम धनंजय मुंडेंच्या जिव्हारी लागली आहे आणि त्या जखमेचा विसर धनंजय मुंडेंना काही केल्या पडत नाही असेच चित्र आहे.
नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक अनेकांना अनेक धक्के देऊन गेली. या लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपने उमेदवारी दिली होती ती पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना , पण खऱ्याअर्थाने त्यांची निवडणूक हातात घेतली होती ती राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेंनी . या निवडणुकीत पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंनी 'सारी प्रतिष्ठा' पणाला लावली होतीच, पण ही निवडणूक म्हणजे आपली 'इज्जत ' असेच धनंजय मुंडे बोलत होते. त्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. पुढे भाजपने विधानपरिषदेवर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन देखील केले. उद्या कदाचित पंकजा मुंडे स्वतः देखील हा पराभव  विस्र्तीळ्ळी,कारण त्या दुःखाला कुरवाळत बसणारांपैकी नाहीत.
पण राज्याचे कृषी मंत्री आणि पंकजा मुंडेंचे चुलतभाऊ असलेले धनंजय मुंडे काही या पराभवाच्या जखमेतून सावरायला तयार नाहीत. हा पराभव ज्या काही गोष्टींमुळे झाला असेल असे त्यांना वाटते , त्या सर्वांनाच ते या जखमेची आठवण वारंवार करताना दिसतात. मंध्यंतरी  बीडमधील काही नेते त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी 'वारे वाघांनो , तुमच्यासारखी माणसे सोबत असल्यावर काही पाहायलाच नको, काय कर्तृत्व करून दाखवलंय ' असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. आता काळ धनंजय मुंडे पुन्हा बीडमध्ये आले होते. निमित्त होते बाबा सिद्दीकी यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्यांक मेळाव्याचे . या मेळाव्यात धनंजय मुंडे तसे 'मोजकेच ' बोलले, मात्र त्यातही त्यांनी आपल्या जखमेचा सल बोलून दाखवलाच . अगदी 'ऐसा जखम दिया है , जो ना कभी भरेगा ' स्टाईलने धनंजय मुंडेंनी 'जो घाव आपने दिया वो बहुत गहेरा है. मैने हमारे इज्जत के लिये आपसे बस एक व्होट ही तो मांगा था , पर बस छह ह्जारसे हमारी इज्जत गयी. आपने दिलसे नाही, दिमागसे सोचा , आपको जो करना था आपने किया , पर ऐसा करके आपके जाती जीवन मी क्या फरक पद ? क्या बदलावं आया ? ' असा प्रश्न धनंजय मुंडेंनी जमलेल्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना केला. 'आम्ही सत्तेत गेलो ते विकासासाठी, आम्ही आमची राजकीय विचारधारा सोडलेली नाही , मुस्लीम  समाजासाठी राष्ट्रवादी काँटॅगही निर्णय घ्यायला तयार असेल  असेही धनंजय मुंडे म्हणाले आणि हे म्हणतानाच 'लोकसभेतली जखम अजून भरलेली नाही, आता किमान विधानसभेत तरी आणखी एक जखम देऊ नका, दोन दोन जखमा सहन होणार नाहीत ' असेही धनंजय मुंडे बोलून गेले. एकुणात काय तर पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंच्या भलताच जिव्हारी लागलाय आणि आता त्या वेदनांच्या कळा येत्या निवडणुकीत कोणाकोणाला घायाळ करणार याचीच चर्चा सध्या जोरात आहे.

Advertisement

Advertisement