Advertisement

 महावितरणच्या अधिकाऱ्याला एसीबीचा शॉक 

प्रजापत्र | Friday, 06/09/2024
बातमी शेअर करा

  बीड-लाचखोरांचे वाढते प्रमाण जिल्ह्यात चर्चेत असून शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या महिला अधिकाऱ्यासह अन्य एकाला रंगेहात पैसे घेताना पकडले आहे.एसीबीने दिलेला शॉक महावितरणसाठी जोरदार ठरला असून या प्रकरणाची चर्चा सध्या मोठया प्रमाणावर सुरु झाली आहे.
   पूनम लहू आमटे (विद्युत सहाय्यक) या धानोरा रोडच्या उपकेंद्रात नौकरीला आहेत. एका ग्राहकांच्या घरात महावितरणने वीज चोरी समोर आणल्यानंतर त्या ग्राहकाला वीज चोरीचे प्रकरण समोर न आणण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोडीअंती १६ हजार रुपये घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचून लाच घेताना खाजगी इसम मानेला रंगेहात पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पूनम आमटे व खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गारदे , अमोल खरसाडे, सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष राठोड , अविनाश गवळी , स्नेहलकुमार कोरडे , अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांच्यावतीने करण्यात आली.

Advertisement

Advertisement