आष्टी दि.०६ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाढत्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना स्थानिक गुन्हे शाखेने कन्हेवाडीच्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस आल्याचे कळते.
कन्हेवाडी येथील खंडु हरीभाऊ सांगळे (वय २४) यांचे घर अज्ञात चोरटयांनी (दि.२८ ) सोमवार रोजी फोडले. यावेळी
घरातील कपाटाचे लॉक तोडुन सोने, नगदी पैसे असे एकुण २,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रामेश्वर जगल्या भोसले रा. पांडेगव्हाण, आष्टी ता. आष्टी जि. बीड यांनी केला आहे व तो सध्या त्याचे राहते घरी आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घरी छाप्पा मारून आरोपी रामेश्वर भोसलेला ताब्यात घेतले.त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात असल्याची कबुली दिली असून अन्य तीन गुन्ह्यात ही तो सहभागी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप-नि. श्रीराम खटावकर पोह अशोक दुबाले, दिपक खांडेकर, पोना सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, नामदेव उगले, सुनिल - राठोड, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करा