Advertisement

मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल

प्रजापत्र | Friday, 06/09/2024
बातमी शेअर करा

 चंद्रपूर :  पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप  नाव न घेता अजित पवार गटाचे नेते व अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर केला आहे. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. ते चंद्रुपरात  बोलत होते.  

 

 

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही परस्पर विरोधी शरद  गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध  मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या  आहेत. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले,   विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार आहे.  माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार.  एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे.  आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही.  

Advertisement

Advertisement