मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा निधी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. सध्या सरकारकडं निधीची कमतरता असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं होतं. परंतू सरकारनं यासंदर्भातील शासन निर्णयात अर्थात जीआरमध्ये बदल केला आहे. या बदलानुसार आता शेतकऱ्यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणंच निधी मिळणार आहे.
आत्महत्याग्रस्त अशा शेतकरी कुटुंबांना तातडीनं निधी देणार असल्याचा जीआर सरकारनं काढला आहे. यापूर्वी निधी नसल्याचं कारण देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा मदत निधी रोखण्यात आला होता. सरकारनं पुन्हा मदत निधी सुरु केल्यानं घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार मिळणार आहे.
बातमी शेअर करा