बीड दि.५ (प्रतिनिधी)- तीन चार दिवसापुर्वी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला अनेक शेतकर्यांच्या कापसाला पाणी लागून कापूस खरा झाला. तसेच इतर पिकांचेही नुकसान झाले. पिकासह घराची देखिल पडझड झाली. जिल्ह्यातील ३७ घरे पडली तर १८ जनावरे दगावली तर एका व्यक्तीचा अतिवृष्टीने मृत्यु झाला.
मराठवाड्यामध्ये चार दिवसापुर्वी संततधार पाऊस पडला. हा पाऊस सलग दोन दिवस होता. या पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. कापुस, सोयाबीन,बाजरी यासह इतर पिकांना पाणी लागल्याने या पिकांनी माना टाकल्या. शेती पिकासह इतरही नुकसान झाले. ३७ ठिकाणी घराची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. पाण्यामुळे १८ जनावरे दगावली. तसेच एका व्यक्तीचाही मृत्यु झाला आहे.
बातमी शेअर करा