चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरचं आयएएस पद गेलं आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजाने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.
दिल्ली हायकोर्टाने पूजाला दिलासा दिला आहे. तिला २६ सप्टेंबरपर्यंत अटक करु नये, असं निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी २६ सप्टेंबरला होईल.
१० दिवसात सविस्तर तपास करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी पूजाला दिलासा मिळाला आहे.
बातमी शेअर करा