बीड दि.३१ (प्रतिनिधी) - शहरातील शहेंशाहवली दर्गाह परिसरात असलेल्या उर्दु शाळेच्या विद्यार्थीनींनी चक्क शिक्षीकेच्या विरोधात आज (दि.३१) रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शिक्षीकेची भाषा योग्य नसून त्या विद्यार्थीनींना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. शिक्षीके विरोधात कारवाई न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही विद्यार्थीनींनी यावेळी दिला.
अधिक माहिती अशी कि,शहरातील शहेंशाहा वली दर्गाह परिसरातील नववी व दहावीच्या उर्दू कन्या शाळेच्या शिक्षीकेच्या विरोधात विद्यार्थीनींनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. शाळेच्या शिक्षीका मुलींना अरेरावीची भाषा वापरतात. मुलींना समाधानाची वागणूक देत नाहीत तसेच शाळेमध्ये त्या नेहमी वेळेवर येत नाहीत. यासह अन्य तक्रारी मुलींच्या आहेत. शिक्षण विभागाने शिक्षीका फिरदोस बाजी यांच्या विरोधात कारवाई न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा विद्यार्थीनींनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या सीओना देण्यात आले.