बीड दि.३१ (प्रतिनिधी)- देशभरातील महिलांवर अन्याय-अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून यासह इतर घटनांसंदर्भात आज (दि.३१) शनिवार रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यांचे संरक्षण करण्यात यावे, देशातील साधू-संतांवर अपमानकारक आरोप करण्यात येत आहेत, हा प्रकार थांबवण्यात यावा, कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज (दि.३१) शनिवार रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये परशुराम गुरखुदे,अनिल जगताप,सचिन उबाळे,राहुल दुबाले,सुदर्शनसिंह बुंदेले, सचीन सोळंके, लखन सोळंके, व्यंकटेश माने, दिनेश परिहार, सचीन वाघ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.