Advertisement

 राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदाची सुत्रे सुभाष राऊतांकडे

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

 मुंबई- राज्याच्या अन्न आयोगाच्या अध्यक्षपदाची सुत्रे समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत यांच्याकडे देण्यात आली आहेत. सुभाष राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच अन्न आयोगावर सदस्य म्हणून निवड झाली होती. आता त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या पदाला राज्यमंत्री दर्जा आहे. 

 

समता परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुभाष राऊत हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता छगन भुजबळ यांच्या शिफारशीवरून त्यांना दोन दिवसांपूर्वी अन्न आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने त्यांना या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 
या निवडीबद्दल सुभाष राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement