Advertisement

 मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, जोडेमारो आंदोलन करणार

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

 

राजकोट किल्यावर आज मोठा राडा झाला. आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्या मोर्चाला निलेश राणे यांनी विरोध केला. यावेळी हाणामारी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. राणे आणि ठाकरे हा वाद चांगलाच पेटला आहे. निलेश राणे देखील आक्रमक झाले आहेत. आधी स्थानिक मग बाहेरच्या लोकांना किल्ल्यावर येऊ द्या, असे निलेश राणे म्हणाले. तर तीन दिवस स्थानिक कुठं होते, असा सवाल ठाकरे समर्थकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही, याविरोधात सरकारला जोडेमारो आंदोलन करणार आहोत. माजी राज्यपाल कोश्यारी यांचं ऑफिस समुद्रकिनारी होतं, वाऱ्याने त्यांची कधी टोपी उडाली नाही, यांचे मंत्री म्हणतात हवेने पुतळा पडला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement

Advertisement