Advertisement

गोदापात्रात वाळू माफियांना एलसीबीचा दणका

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.२८ (प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध वाळू वाहतूक आणि माफियांवर कठोर कारवायांच्या सूचना दिल्या असतांना आता स्थानिक गुन्हे शाखेने पुढाकार घेत आज सकाळी ९.३० च्या सुमारास गोदापात्रात छापा मारून पाच टॅक्टर,पाच केन्यासह जवळपास ३० लाखांचा मद्देमाल जप्त केला आहे.पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावतीने ही मोठी कारवाई करण्यात आली.
           बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि माफियांचा मुजोरपणा मोडीत काढण्यासाठी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी कंबर कसली आहे.मागच्या महिनाभरापासून त्यांनी वाहतूक शाखेचे प्रमुख असलेल्या सुभाष सानप यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपविली होती.सानप यांनीही गोदापात्रात कारवाया केल्या होत्या.आता स्थानिक गुन्हे शाखेने देखील गोदापात्रात लक्ष केंद्रित करून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राक्षसभुवनच्या गोदापात्रात माफिया भर सकाळीच वाळू भरत असताना पोलिसांनी हा छापा मारला.दरम्यान स्थानिक पातळीवरील ठाणेदार माफियांना कारवाईपासून संरक्षण देत स्वतःच्या पदरात लाखांचा नजराणा पाडून घेत असल्याची बातमी प्रजापत्रने प्रकाशित 
केल्यानंतर आता चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीने छापा मारून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Advertisement

Advertisement