महाराष्ट्र- आज पंचायत समिती औंढा येथे डब्ल्यू आय एफ एस व पी एच एम एस या विषयावर आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण राज्य प्रशिक्षक म्हणून डॉक्टर सतीश रुणवाल यांनी घेतले, त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुराधा गोरे, जिल्हाध्यक्ष बबन कुटे, जिल्हा सरचिटणीस हरिश्चंद्र गोलाईतकर, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर कोकाटे,तालुकाध्यक्ष मनोज पारटकर तसेच महिला हक्क संरक्षण समितीच्या श्रीमती वागतकर, श्रीमती शेंबडे, श्रीमती बर्गे, श्रीमती कराळे, श्रीमती सोनल प्रधान यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुराधा गोरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यानंतर कंत्राटी कर्मचारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र जवळाबाजार येथे कार्यरत असलेल्या व हिंगोली येथील नियमित भरतीमध्ये त्यांची नियमित आरोग्य सेविका म्हणून निवड झाल्याने श्रीमती अनुसया सोळंके यांचे अभिनंदन करून संघटनेच्या वतीने त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.