Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयातच तिघांनी अंगावर डिझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजापत्र | Monday, 26/08/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२६ (प्रतिनिधी)-  गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी ग्रामपंचायतच्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका, जिल्हा चौकशी समितीने येवून चौकशी केली, पाहणी केली आणि पंचनामे देखील केले, तरीही अहवाल दिला नाही. गेल्या पाच महिन्यापासून अधिकारी कर्मचारी मिळून छळ करत आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही जाच केल्याचा आरोप करत या जाचाला कंटाळून रेवकी देवकीच्या सरपंच शशिकला मस्के, त्यांचा मुलगा बाळासाहेब मस्के आणि सून मयुरीताई मस्के यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थे टळला.

 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारच्या सुमारास रेचकी देवकीच्या सरपंच शशिकला मस्के, बाळासाहेब मस्के आणि मधुरीताई मस्के यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. चौकसी समितीच्या अहवाल देण्यावरून गेल्या पाच महिन्यापासून अधिकारी, कर्मचान्यांनी मिळून आमचा छळ चालवला आहे. ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आमच्याबर अन्याय करत असुन त्यांनी त्या पुढा-यांची नावे सांगावीत अन्यधा आम्ही या सवांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करू असा इशारा सरपंच शशिकला मस्के यानी दि.१६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेला निवेदनाद्वारे दिला। होता. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम, गटविकास अधिकारी सचिन सानप व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे यांच्या बाचाला कंटाळून आत्मदहन करणार आहोत असे त्यांनी दि.१६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. सरपंच यांनी स्वतः जिल्हा परिषदेला निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता, तरीही प्रशासनाने काहीच न केल्याने शेवटी आज सरपंचासह दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. 

Advertisement

Advertisement