बीड दि.२४ (प्रतिनिधी)- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाआघाडीने बंदचे आवाहन केले होते. मात्र या बंदला कोर्टाने परवानगी नाकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडबंद आंदोलन करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला होता. आज सकाळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन तोंडबंद आंदोलन केले.
बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला. या घटनेने अवघ्या देशात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर जिल्हाधिकारी, तहसील कार्यांवर निदर्शने करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ‘तोंडबंद’ आंदोलन केले. तोंडाला काळीपट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बदलापूर घटनेतील दोषी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.