महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गृहखात्याने सतर्क राहावे, अशी सूचना केली आहे. बदलापूर घटनेचा संदर्भ देत पवार म्हणाले की, एका शाळेत असा गुन्हा घडणे धक्कादायक आहे. त्यानंतर या कथित गुन्ह्याबद्दल बाहेर सार्वजनिक प्रतिक्रिया ही उमटल्या, असे त्यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांनी मोठं वक्तव्य केले आहे. याआधी उद्धव ठाकरेंनीही यावर भूमिका स्पष्ट केली होती. आता यावर कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष आहे. शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री कोण होणार हा माझ्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या पक्षातील कोणीही इच्छुक नाही. आम्हा कोणालाही मुख्यमंत्रीपदासाठी रस नाही. आम्हाला राज्याला सुशासन द्यायचे आहे, म्हणून येथे सरकारमध्ये बदल हवा आहे, त्यामुळे कोण होणार किंवा नाही हा माझ्यासाठी प्रश्न नाही, अस म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे.