पुणे दि.२२ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीतर्फे २५ ऑगस्टरोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. गुरुवारी आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
बातमी शेअर करा