बीड दि.१९ (प्रतिनिधी) -जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी तसेच त्यांच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ८७८८९९८४९९ हा हेल्पलाईन नंबर आज (दि.१९)सोमवारी जाहीर केला. याच नंबरवर तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरीक, समाजसेवक यांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने ८७८८९९८४९९ हा व्हॉट्सप हेल्प लाईन नंबर सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांनी या व्हॉट्सप हेल्पलाईन नंबरवर तक्रारी/विनंती अर्ज लेखी स्वरूपात पीडीएफ करून पाठवावेत . सदर तक्रारींच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वतीने आवाहन करण्यात आले. या तक्रारी करताना त्या टंकलिखित केलेल्या असाव्यात, तसेच काही पुरावे इतर काही कागदपत्रे असतील तर त्या हर्वांची एकच पीडीएफ तयार करावी. तसेच याची साईज १० एमबी पेक्षा जास्त नसावी असे कळविण्यात आले आहे. हेल्पलाईन नंबर जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु यावर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा