बीड दि.१९ (प्रतिनिधी) परळी येथे २१ तारखेपासून पाच दिवस कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कृषी प्रदर्शनाकरीता बीड जिल्हयातुन वेगवेगळया ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरीक हे आपआपली वाहने घेऊन येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई-परळी-गंगाखेड मार्गासाठी अंबाजोगाई - कन्हेरवाडी बायपास मार्गे- गंगाखेड रस्ता पर्याय म्हणून देण्यात आला आहे. तर गंगाखेड-परळी-अंबाजोगाईसाठी गंगाखेड- इंटके कॉर्नर परळी- टोकवाडी बायपास मार्गे अंबाजोगाईकडे वाहतूक वळविण्यात येणार आहे.दरम्यान वरील मार्गावरील सर्व वाहतुक (कृषी प्रदर्शनाकरीता जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, अॅम्बुलंन्स, अग्नीशामक दलाची वाहने वगळून) ही दि.२१ ऑगस्ट रोजीचे सकाळी ०८:०० ते १०:००वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतुक वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा