बीड दि.१७ (प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी हद्दीतील कडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ९ जणांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईत नगदी रोकड ३८ हजार ५३० रुपये व इतर ऐवज असा १ लाख ४४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यावर कारवाईच्या सूचना केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी कड्यातील सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून ९ जणांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बातमी शेअर करा