Advertisement

आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ बदलला

प्रजापत्र | Tuesday, 13/08/2024
बातमी शेअर करा

मुंबई- आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्ष करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्षे करण्याला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी अडीच-अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षांत होत होते. आता एकाच नगराध्यक्षाचा काळ पाच वर्षांचा असणार आहे.

Advertisement

Advertisement