Advertisement

आशीर्वाद द्या, नाहीतर 'लाडकी बहि‍णीं'चे १,५०० रुपये काढून घेऊ

प्रजापत्र | Monday, 12/08/2024
बातमी शेअर करा

अमरावती- सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचे हवा आहे. सत्ताधारी या योजनेला घेऊन वातावरण तापवत आहेत, तर विरोधक या योजनेवर शंका उपस्थित करून टीका करत आहेत. त्यातच आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला आर्शीवाद दिले नाही तर तुमचे दीड हजार काढून घेऊ असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

रवी राणा नेमकं काय म्हणाले?
विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आमचे सरकार आले तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारवरून तीन हजार करू. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे, असं राणा म्हणाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावती येथे रणी राणा यांनी घेतला होता. यावेळी ते बोलत होते.

 

 

कार्यक्रमावेळी अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले की, 'ज्याचं खाल्लं त्यांचं जागलं पाहिजे. सरकार देत आहे, पण त्यांना आर्शीवादही मिळायला हवा.' रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.पैसा कुणाचा आहे. रणी राणांचा आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा हा पैसा आहे का? थोड्याच्या पैशासाठी महिला विकल्या जातील असं त्यांना वाटतं का? असला नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही. महिलांना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? हा पैसा सरकारचा आहे. ही फक्त मतांसाठी योजना आणली आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

Advertisement

Advertisement