Advertisement

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा.

प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा

 

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे.

एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचं कळतं.

Advertisement

Advertisement