जळकोट दि.९ (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावालगत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व गरजू रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा यासाठी घोणसी, मंगरुळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला. मंगरुळ येथील प्राथमिक केंद्राचे काम पूर्ण झाले तर घोणसीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आज भुमीपुजन करण्यात आले. कोरोना काळात पहिल्या आमदार फंडातुन १२ रुग्णवाहिका उपलब्ध करुन या भागातील नागरिकांच्या सेवेत दिल्या असुन भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्याच्या सुविधा पुरविणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते घोणसी ता.जळकोट येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजना प्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, सभापती विठ्ठल चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष सत्यवान दळवे पाटील, बालाजी मालुसरे, रामराव राठोड, पाणीपुरवठा अभियंता विरभद्र स्वामी, सरपंच चंद्रशेखर पाटील, पोलिस पाटील सोमेश्वर परगे, विनायक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही.वडगावे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार, डॉ.प्रशांत कापसे, नगरसेवक ॲड. तात्या पाटील, खादर लाटवाले, रामराव राठोड, श्रीनिवास पाटील, संतोष पवार, नायब तहसीलदार राजाराम खरात, गजानन दळवे, सरपंच यादवराव केंद्रे, रवी चोले, गोविंद भ्रमण्णा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या तिरू नदीवर ७ बॅरेजेसची उभारणी करुन पाणी अडवुन शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली आहे. येत्या काळात आपला शेतकरी बांधव हा सुखी होईल. या बॅरेजेसमुळे
या भागातील विहिरींची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम् होणार आहे. तालुक्यातील सर्व रस्ते हाँटमिक्सने जोडले गेले आहे. उदगीर बरोबर जळकोट तालुक्याला कोट्यवधी रुपये मंजूर करुन विविध इमारती उभारल्या. भविष्यात रस्ते,वीज, पाणी याची मतदार संघातील जनेतला अडचण होणार नाही याची काळजी घेवुन सर्व कामे केली आहेत. आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गाव हे विकासाचे मॉडेल गाव म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली.
कार्यक्रामचे प्रास्ताविक प्रा.शाम डावळे यांनी केले तर आभार दीपक आम्रे यांनी आभार मानले.
यावेळी घोणसी सह परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजापत्र | Friday, 09/08/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा