परंडा दि.७ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते दि. ९ व १० रोजी परंडा तालुक्यामध्ये विविध विकासकामाचे लोकार्पन व भुमीपुजन करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते दि. ९ रोजी परंडा तालुक्यातील कंडारी, रोहकल येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच साकत पश्चिम, साकत बु., कुंभेफळ, पाचपिंपळा, अंदोरी, जाकीपिंपरी, टाकळी, राजुरी, आंदोरा, खासापुरी नं. २, खासापुरी नं. १ ,चव्हाणवाडी येथे गाव भेट घेणार आहेत. तर दि.१० शनिवार रोजी बावची येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दहिटणा बोडखा, सरणवाडी, ब्रह्मगाव व इतर गावांना भेट देऊन परांडा येथे माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत.
वरील दिलेल्या गावातील शिवसेनेच्या पदाधिकारी व परंडा तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी व शिवसेना पक्षातील सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे यांनी केले आहे.