बीड - नगर ते आष्टी रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वेचा पुढचा टप्पा म्हणजे अंमळनेर ते विघनवाडी पर्यंत आता रेल्वे धावणार आहे. त्यासाठीचे टेस्टींग ९ ऑगस्ट रोजी होत आहे. नगर-बीड- परळी रेल्वे या मार्गावर दोन वर्षापुर्वी अहमदनगर पासून ते सोलापुरवाडी दरम्यान ह्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. एकुण ३५ किलोमीटर अंतर ही चाचणी घेण्यात आली होती. आतापर्यंत तीन चाचण्या झाल्या. एकदा नगर ते नारायणडोह पर्यंत बारा किलोमीटर आणि नगर ते सोलापुरवाडी ३५.५ किलोमीटर आणि नगर ते आष्टी हे ६० किलोमीटरचे नगर ते अंमळनेर या ६६ किलोमीटर अंतरावर हाय स्पीड चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता अंमळनेर ते विघनवाडी ६६.१२ किलोमीटर इतके आहे. अहमदनगर-बीड- परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्वाचा विकास प्रकल्प आहे.
बातमी शेअर करा