Advertisement

अविनाशच्या सुवर्णपदकाकडे कुटुंबासह देशाच्या नजरा

प्रजापत्र | Wednesday, 07/08/2024
बातमी शेअर करा

आष्टी - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फायनल मध्ये पोहचलेला अविनाश आज अंतिम सामना खेळणार असून त्याच्या सुवर्णपदकाकडे कुटुंबासह देशाच्या नजरा लागल्या आहेत. देशासाठी तो जिंकेल असा आत्मविश्वास कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्य़ातील आष्टी सारख्या दुष्काळी भागातील मांडवा येथील अंत्यत गरीब घरातील अविनाश साबळे याचे नाव क्रिडा क्षेत्रात गाजत आहे. पॅरिस ऑलिम्पिक धावपटू अविनाश साबळे स्टेपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज मध्यरात्री दीड वाजता हा सामना सुरू होणार आहे. अविनाश सुवर्णपदक घेऊनच या देशात येईल,  असा आत्मविश्वास अविनाश साबळे याच्या कुटुंबाने  व्यक्त केला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून साबळे कुटुंबीयांना शुभेच्छा देणार आहेत.तर अविनाश सुवर्णपदक मिळवेल हा आमचा आत्मविश्वास असून त्या क्षणाक्षणाची आम्ही वाट पाहत आहोत. विजयी झाल्याची बातमी कधी कानी पडतेय याकडे आमचं मन लागलेल आहे. देशातील जनतेला त्याच्या विजयाची आस लागली असून ती शंभर टक्के पूर्ण होईल. समाधानकारक कामगिरी करून देशाला पदक मिळवून देणार असल्याचा आत्मविश्वास अविनाशचे वडिल मुकूंद साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement