Advertisement

बारावीत वीत शिकणारे चार मित्र बुडाले

प्रजापत्र | Tuesday, 06/08/2024
बातमी शेअर करा

नांदेड : सध्या पावसाळा असल्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाई धबधबा, नदी, ओढा आणि पाणी असलेल्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाते. मात्र, यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याशी खेळते, फोटो आणि सेल्फीच्या नादात दरी-खोऱ्यात उतरते, डोंगरांच्या कठड्यावर बसून शूट करते. त्यातून, अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. नांदेड शहराजवळील एका खदानी बुडून ४ मित्रांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. शहराजवळच्या झरी येथील खदानीत बुडून चार युवकाचा मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चारही तरुण १२ वीचे विद्यार्थी होते. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम सुरू केली होती. 

Advertisement

Advertisement