लोकसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, लोकसभेत बससेल्या फटक्यामुळे महायुती सावध पाऊले टाकत आहे. अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती करत आहे. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याची तारखीच मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केली आहे.
कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना करताना २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होईल, असे मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले. ते सोलापूरमध्ये बोलत होते.डीपीडीसीच्या खर्च विषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ३१ ऑगस्टपर्यंत वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिला आहे. तसेच २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होईल, असे गृहीत धरून काम करण्यास सांगितले आहे.
बातमी शेअर करा