क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.
भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत एकूण ५९० गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघे १९८ , प्रोनमध्ये १९७ आणि उभे राहून १९५ गुण मिळवले. याच स्पर्धेत आणखी एका भारतीय ऐश्वर्या प्रताप सिंगची एकूण धावसंख्या 589 होती.
भारताने आतापर्यंत जिंकली दोन पदके
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दोन पदक आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. महिलांच्या या स्पर्धेत मनुने कांस्यपदक पटकावले. यानंतर मनुने सरबज्योत सिंगसोबत त्याच मिश्र स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकले.