Advertisement

आरक्षण बचाव यात्रा काढणार

प्रजापत्र | Tuesday, 16/07/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर - राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. या आरक्षणाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी १८ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले.
 

Advertisement

Advertisement