Advertisement

 ॲड.प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा!

प्रजापत्र | Tuesday, 16/07/2024
बातमी शेअर करा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणामुळे मोठी उलथापालट होणार का ? प्रश्नांना यामुळे उधाण आले आहे.

 

विधानसभेची तयारी की राजकीय उलथापालथ?
विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्षांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कुठे कोणता उमेदवार द्यायचा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे. 

 

 

 

पत्रकार परिषदेबाबत केले ट्विट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली जाणार आहे का? नक्की या घोषणेचा उद्देश काय असणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. यासाठी शहरातील सुभेदारी विश्रामगृहात ऍड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एक व्हिडिओ ही X समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement