Advertisement

पेट्रोल-डिझेलचा भडका;बीडमध्ये ही वाढले इंधनाचे दर

प्रजापत्र | Wednesday, 13/01/2021
बातमी शेअर करा

बीड-सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडक उडणे सुरु असून बुधवारी (दि.१३) इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत.सध्या बीडमध्ये पेट्रोल २४ पैसे तर डिझेल २६ पैशांनी वाढले.पेट्रोलचा दर ९३ च्या घरात गेला असून डिझेलने ८२ रुपयांचा आकडा ओलांडला आहे.
                 पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बुधवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते.मात्र आता बीडमध्ये पेट्रोल ९२.३४ तर डिझेल ८१.३५ रुपयांच्या घरात आहे.देशात सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. क्रूड ऑईल प्रति बॅरल ५३.५० डॉलर वर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 56.58 डॉलर प्रति बॅरलवर असल्याचं पाहायला मिळालं.सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल्या दरांत वाढ केली.ज्यामुळे डिझेलचे आणि पेट्रोलच्या दरात वाढ झाली.

Advertisement

Advertisement