शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्वांसमोर एका कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर अन्याय केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मन जाणून घेत निर्णय घेणार असाल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असे म्हणत भाजपच्या बैठकीत या पदाधिकाऱ्याने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.