Advertisement

दिलासादायक ! आज 'या' शहरांमध्ये पोहचणार कोविशिल्ड लस

प्रजापत्र | Tuesday, 12/01/2021
बातमी शेअर करा

दिल्ली :करोनावर परिणामकारक ठरणाऱ्या दोन लसींना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती पकडली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सहा कंटेनर रवाना करण्यात आले. त्यानंतर आता १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी तीन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची विमान सज्ज झाली आहेत.
                                       केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याविषयी माहिती दिली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस देशभरात पोहोचवली जाणार आहे. आज (१२ जानेवारी) एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement