Advertisement

 गेवराई शहरात आढळला मृतदेह!

प्रजापत्र | Thursday, 13/06/2024
बातमी शेअर करा

 गेवराई-  शहरारील एका हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आज (दि.१३) गेवराई-जातेगाव रस्त्यावरील टीएमसी परिसरात आढळून आला.

 

 

 अधिक माहिती अशी की, गणेश नाथा आबदगिरे (वय ४५, रा.मुंगी ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गेवराई शहरातील यशराज नगर येथे राहत होते. शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश हा आचाऱ्याचे काम करत होता. बुधवारी (दि.१२) रात्री हॉटेलचे काम आटोपून गणेश बाहेर पडला. गणेश आबदगिरे याचा मृतदेह आज टीएमसी परिसरात आढळून आला. दरम्यान गणेश यांची दुचाकी एका ठिकाणी तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने घातपातची शक्यता असल्याचे कुटुंबीयाचे म्हणणे आहे. याबाबत गेवराई पोलिसांना माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement