Advertisement

  चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे - शरद पवार

प्रजापत्र | Wednesday, 12/06/2024
बातमी शेअर करा

  "सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  म्हणाले. शरद पवारांनी  काल बारामतीतील वकिल, डॉक्टर यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. आज त्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांची संवाद साधला आहे. 

 

 

दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचे पाणी घेतो, हे थांबले पाहिजे 
शरद पवार म्हणाले, नियमित पाणी आहे, ते मिळायला पाहिजे. माझा दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचे पाणी घेतो, हा उद्योग थांबल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. माझ्या डोक्यात असं आहे की, हा तुमचाच प्रश्न आहे असं नाही. आम्ही जाईल तिथे लोक म्हणतात दुधाच्या भावासंबंधी राज्य सरकारपुढे म्हणणे मांडावे लागेल, असे आश्वासही शरद पवारांनी दिले. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्यावेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. 

 

 

आमचा प्रयत्न आहे , काहीही करून सरकार बदलायचं
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पाणी- चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही. मुंबईला गेल्यावर सरकारशी बोलेन. चार महिन्यांनी निवडणुका येतील,आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे. तोवर काही करू शकत नाही. इथली जमीन करायला मोदी येणार नाहीय,काहीही झालं तर जमीन करायची. पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आपण सगळे एकत्रित असलो तर सरकार करेल, मी तुमच्या सोबत असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. आजच्या घडीला संसार चालवायला, दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्यावेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी मी विनंती करतो, असंही शरद पवारांनी  सांगितले.

Advertisement

Advertisement