Advertisement

पाण्यात बुडून तिघांचा दुर्दैवी अंत

प्रजापत्र | Thursday, 30/05/2024
बातमी शेअर करा

राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात म्हणजे दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला भटवाडी येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष, एक महिला व एक तेरा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

राधानगरीतील भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे हे यातील पुरुषाचे नाव असून अन्य दोन महिलांची ओळख पटलेली नाही. तसेच 13 वर्षाच्या मुलीचा देखील यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
 

Advertisement

Advertisement